कन्नडच्या टोमॅटो उत्पादकांचा सोलापूर - धुळे महामार्गावर रास्ता रोको

Foto
चार तास रास्ता रोको, महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प, वाहनांच्या रांगाच रांगा

कन्नड, (प्रतिनिधी) : व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या लुटीच्या विरोधात हजारो टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी राज्य सरकारचा तीव्र निषेध करीत सोलापूर महामार्गावरील कन्नडपासून पाणपोई फाट्यानजिक चार तास रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे सोलापूर धुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या आंदोलनामुळे महामार्गावरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. भर पावसात या शेतकऱ्यांनी न डगमगता आपला रास्ता रोको सुरूच ठेवला.

सोलापूर धुळे महामार्गावर शहरापासून ५ किलो मीटर अंतरावर असलेल्या पाणपोई फाठ्यावर आज दुपारी ४.३० वाजेपासून टोमॅटो खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबविण्यात यावी, यासाठी हा संतप्त
शेतकऱ्यांनी रास्ता रोको करण्यात आला व्यापारी हे २ ते ६ रुपये किलो दराने खरेदी केल्या जात असल्याने शेतकरी संतप्त झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व हे सर्वसामान्य शेतकरी स्वतः करीत आहे ह्यावर्षी शेतकरी प्रचंड अडचणीत आहे अतिवृष्टीमुळे हाता तोंडाशी आलेला घास वाया गेला.

चहुबाजूने शेतकरी संकटात आहे तालुक्यात शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाट देत आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करीत टोमॅटो, हळद, अद्रक या पिकांची मोठी प्रमाणावर लागवड करीत आहे. जास्त पाऊस पडल्यामुळे अद्रकचे पिक पूर्णपने हातचे गेले आहे, अनेक टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे टोमॅटो पिक सुद्धा हातचे गेले आहे. ज्या शेतकऱ्यांनी दुसऱ्या टप्प्यात लागवड केली त्यांना आता चांगला भाव मिळत असताना टोमॅटो उत्पादकांकडून व्यापारी कवडीमोल भावाने खरेदी करीत आहे. बाजार समितीच्या वतीने पाणपोई येथे टोमॅटो लिलाव सुरू करण्यात आला असून या लिलावात टोमॅटो खरेदी करणारे व्यापारी हे दिल्ली येथून आले,

परिसरातून त्यांनी अनेक दलाल हाताशी धरले असून ते २ ते ६ रुपये दराने टोमॅटो खरेदी करत आहे. यात लहान मोठे टमाटे वर्गीकरण करून लहान टमाटे ३० रुपये गोणी भावाने खरेदी करतात टोमॅटोच्या एका कॅरेटमध्ये २४ किलो टोमॅटो बसतात. एका शेतकऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती सांगितली की, सुरत येथे टोमॅटो पाठवले असता ४५० प्रति कॅरेट पडते. १०० रुपये प्रति कॅरेट खर्च येतो. या ठिकाणी कुठलेही वर्गीकरण न करता त्याच सोबत याठिकाणी भाड्या व्यतिरिक्त कुठलाही खर्च नसतो. नागपूर येथे आजचं टोमॅटो विकले. त्या ठिकाणी ५५० रुपये प्रति कॅरेट भाव मिळाला.

या ठिकाणी प्रति कॅरेट १५० रुपये खर्च येतो. पाणपोई येथे सध्या प्रति कॅरेट अंदाजे ५० ते १५० रूपये पडतो. त्याच बरोबर १० रुपये कमिशन प्रति कॅरेट त्याच सोबत वाहतूक खर्च २५ रुपये येतो. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात फायदा मिळत नाही.
त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. या वेळी दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. सध्या दिवाळी सणानिमित्त सोलापूर धुळे महामार्गावर मोठी वर्दळ असते. त्यामुळे प्रवासी वैतागले आहे.

अंदाजे ५ किलो मीटर अंतरावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कन्नड शहर बसस्थानकात संभाजीनगर, धुळे व चाळीसगावकडे जाणारे महिला व अबाल वृद्ध प्रवासी यांचा खोळंबा झाला. घटनास्थळी बाजार समितीचे सभापती डॉ. मनोज राठोड, उपसभापती जयेश बोरसे, संचालक किशोर आबा पवार, नायब तहसीलदार दिलीप सोनवणे हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी संतप्त शेतकऱ्यांनी समजूत घातली,

आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. काही वेळानंतर लिलाव पुर्वरत सुरू झाला. रास्ता रोको मागे घेतल्यामुळे वाहतूक सुरू झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निः श्वास सोडला. यावेळी कन्नड शहर पोलिस निरीक्षक आर, बी. सानप यांनी आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.